तुमची शेती पडीक आहे किंवा तुम्हाला शेती करण्यासाठी जॉब मुळे वेळ भेटत नाही. चला तर आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्याच साठी खास शेती व्यवसाय एकदाच रोपटे लावा आणि कमवा लाखो रुपये.
बांबूची शेती :-
बांबूला मेरिकल ग्रास म्हणून देखील ओळखले जाते, कारण की याचा उपयोग खूप सारे प्रॉडक्ट बनवण्यासाठी होतो. जसे की बांबू टूथ ब्रश,पाण्याची बॉटल,बासुरी,खुर्च्या,टेबल,बांबूचे घर,इत्यादी गोष्टीसाठी बाबूंचा मोठा वापर होतो.बांबूला प्लास्टिक आणि लाकडांचा अल्टरनेट म्हणून वापरण्यात येऊ शकते.याच कारणांमुळे बांबूची मागणी मागच्या काही वर्षांत वाढताना दिसत आहे.वाढत्या मागणीमुळे आज खूप जण बांबू शेती करण्याचा विचार करत आहे.
बांबूला तुम्ही कोणत्याही मातीमध्ये उगवू शकतात.बांबूचे सर्वात जास्त उत्पादन मान्सूनच्या वेळेस होते.बांबूच्या झाडाला सुरुवातीला जास्त पाणी लागते.बांबूच्या एका झाडाची जवळपास किंमत ही 20 रुपये इतकी असते.झाड लावल्यानंतरच्या 4 ते 5 वर्षात झाडाला बांबू यायला सुरुवात होते.मार्केटमध्ये एक बांबू तुम्ही कमीत कमी 60 रुपयाला विकू शकतात.पहिल्या 4 वर्षात बांबू फार कमी उत्पादन देतात पण त्यानंतर ते अगदी झपाट्याने वाढ घेतात.
बाबूं शेती करायची पध्दत
बांबूला मुख्यतः तीन प्रकारे उगवले जाते,पहिल्या पद्धतीमध्ये बी लावून उगवले जाऊ शकते.पण बांबूचे बी मार्केटमध्ये लवकर उपलब्ध होत नाही.
बांबूला लावण्याची दुसरी पध्दत म्हणजे बांबूचे मुळे मातीत लावणे.तुमच्या आसपास कोणाच्या शेतात बांबू असेल तर त्याचे मुळे काढून तुम्ही तुमच्या शेतात लावू शकतात.
तिसऱ्या बांबूला लावण्याची पध्दत म्हणजे टिशू पध्दत! ज्यामध्ये बांबूच्या झाडांना शेतीत लावले जाते.यामध्ये बांबू बरोबर शेतकरी दुसरे पीक पण घेतात यामुळे त्यांचे प्रॉफिट जास्त होते.
Comments
Post a Comment