शासनाने दि.१/०२/२०२३ ते दि. ३१/३/२०२३ या कालावधीत कृषी उत्पन्न
बाजार समिती, अहमदनगर मध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ३५०/-रुपये कांदा अनुदान जाहीर केलेले असुन बाजार समिती, नेप्ती उपबाजार अहमदनगर मध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांनी दि.३/४/२०२३ ते दि.२०/४/२०२३ या कालावधीत पुढील कागदपत्रे जोडुन अर्ज कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथील मुख्य कार्यालय-किसान क्रांती इमारत,पहिला मजला,मार्केट यार्ड,अहमदनगर . येथे जमा करावेत.
१) कांदा विक्रीची मुळ हिशोब पट्टी
२) कांदा पिकाची नोंद असलेला ७/१२ उतारा
३) बैंक पासबुकाची पहील्या पानाची सुस्पष्ट झेरॉक्स प्रत.
४) आधारकार्डची झेरॉक्स प्रत.
५) ज्या प्रकरणात ७/१२ उतारा वडीलांच्या नावे व विक्री पट्टी मुलाच्या अथवा अन्य कुटुंबीयाच्या नावे आहे,अशा प्रकरणामध्ये सहमती असणारे शपथपत्र आवश्यक आहे.
सदरचे अर्ज स्वीकारण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगरचे मुख्य कार्यालयात बँक वाईज टेबल व्यवस्था केलेली असून,प्रत्येक बँकेसाठी स्वतंत्र कर्मचारी नेमलेले आहेत.ज्या बँकेचे पासबुक आहे,त्या बँकेचे नाव विचारून सदर ठिकाणी आपण फॉर्म दाखल करावयाचा आहे.

Comments
Post a Comment