Skip to main content

महाराष्ट्र शासन कृषि विभागाची महा DBT योजना ऑनलाईन फॉर्म भरणे सुरु आहे.

महाराष्ट्र शासन कृषि विभागाची महा DBT योजना ऑनलाईन फॉर्म भरणे सुरु आहे.  योजना अनेक अर्ज एक 1) ट्रॅक्टर 4WD/2 WD 2) पॉवर टिलर, पॉवर विडर 3) ट्रॅक्टर चलीत सर्व प्रकारची औजारे व यंत्रे 4) ठिबक सिंचन, तुषार सिंचन ( मीनी/मायक्रो स्प्रींकलर)  5) इ.मोटार/ डिजल इंजिन  6) पाईप लाईन  7) शेततळे 8) शेततळे अस्तरीकरण 9) औजारे बँक 10) कांदा चाळ 11)कडबा कुट्टी, पाचट कुटटी  12) स्प्रेपपं13) पॅक हाउस 14) कोल्ड स्टोरेज 15) फळबाग लागवड ड्रॅगन फ्रुट इ. 16)डाल मिल   18) ट्रॅक्टर चलीत फवारणी यंत्र (ब्लोअर) 19) भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना  20) विविध पिक कापणी यंत्रे ( हावेस्टर / रिपर ) 2 1) धान्य व बियाणे प्रक्रिया यंत्रे 22) सोलर ड्रायर 24) पल्व्ह रायझर इ. अनेक शेती औजारे यंत्रे शेतिमाल प्रक्रिया मशिनरी  25) डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना अनुसूचित जाती ( SC) लाभाथीं साठी नवीन विहीर खोदणे , विहीर दुरुस्ती , विहीर पूर्णकरण, शेततळे ,इ. मोटार/ डिजल इंजिन,पाईप लाईन , ठिबक सिंचन तुषार सिंचन,भाजीपाला लागवड किट इ. आवश्यक कागदपत्रे:- 1) ८अ व ७/१२ उतारा...

बजरंग ग्रुप पिंपळगाव माळवी येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील धूम धडाक्यात हनुमान जन्मोत्सव साजरा

हनुमान जन्मोत्सव बजरंग ग्रुप पिंपळगाव माळवी

       ज्याच्या मनात आहे श्रीराम,
ज्याच्या तनात आहे श्रीराम,
संपूर्ण विश्वात जो आहे बलवान
अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम…
  
        बजरंग ग्रुप पिंपळगाव माळवी येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील धूम धडाक्यात हनुमान जन्मोत्सव साजरा झाला. या वर्षी आणखी नवीन कार्यक्रमाची भर घालत विनोदाचार्य ह.भ. प. महेश खेडकर महाराज चिंतामणी रवळगाव ता. कर्जत यांचे जाहीर हरीकीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला. त्याच प्रमाणे गायनाचार्य स्वरभास्कर ह. भ. प. बाळासाहेब तांदळे आणि ह.भ. प. अशोक महाराज देसाई तसेच मृदुंगसम्राट पांडुरंग महाराज अंभोरे आळंदी देवाची यांची साथ देत अतिशय उत्कृष्ट रित्या कीर्तन सोहळा पार पडला. कीर्तन समाप्ती नंतर महाप्रसाद चे नियोजन देखील खूप छान पद्धती चे केले होते. तसेच बजरंग ग्रुप हा धार्मिक व सामाजिक कामात देखील पिंपळगाव माळवी येथे अग्रेसर आहे.

     
आजच्या नवीन युतीने बजरंग ग्रपूचा आदर्श घेतला पाहिजे.रामनवमी नंतर येणाऱ्या चैत्र पौर्णिमेला हनुमान जन्मोचव साजरा केला जातो. या दिवशी या पवनपुत्र हनुमानाचा जन्म झाला आणि म्हणूनच संपूर्ण भारतात बजरंग बली हनुमानाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. 
     असे मानले जाते की जो भक्त हनुमान जयंतीचे व्रत पूर्ण भक्तिभावाने ठेवून बजरंगबलीची उपासना करतो त्याला आयुष्यात कधीही दुःख आणि संकटांचा सामना करावा लागत नाही. 


सुर्याचा घ्यायला गेला घास,
जो वीरांचा आहे खास,
त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान !
हनुमान जन्मोत्सव निमित्ताने खूप-खूप शुभेच्छा !

Comments